⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

.. तोपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे ; पं.स.सदस्य शेखर पाटील यांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील सावखेडा-हिंगोणा जिल्हा परिषद गटातील लघु सिंचन विभागातर्फे सुरु असलेले आणि झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची आणि थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संबंधितांची चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे.

दि.8 फेब्रुवारी2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सावखेडा होणा-या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत चालू वर्षात बंधाऱ्याची कामे मंजूर होऊन ठेकेदारांमार्फत कामे पूर्ण झालेली आहेत तर काही कामे सुरू आहेत ही बंधाऱ्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने या नाल्यावर बंधारा बांधला जात आहे बेकायदा त्याचं नाल्यातील माती मिश्रित वाळू वापरून व त्याच भागातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरील दगड-गोटे गोळा करून वापरून नाला बांधकाम तीन ते चार दिवसात पूर्ण केले आहे.

याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगून तसेच आमच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत वेळोवेळी तक्रार करून सुद्धा संबंधित उपविभागीय अधिकारी शाखा अभियंता त्या कामाकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराचे बिल काढण्याबाबत ठेकेदारांना मदत करीत आहेत या सर्व झालेल्या बंधारे बांधकामाची गुण नियंत्रक विभागाकडून पडताळणी करण्यात यावी किंवा ज्या कोणी पार्टीने निकृष्ट झालेल्या बांधकामाचे कामाचे थर्ड पार्टी ऑडिट केले असेल आणि संबंधित ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी बिल काढले असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे.

याच प्रमाणे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात ग्रामपंचायत क्षेत्रात खडीकरण,डांबरीकरण, गटारीचे बांधकाम,घरकुल इत्यादी सर्व कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने सदर कामे सुरू असताना संबंधित शाखा अभियंता कामा ठिकाणी प्रत्यक्ष व्हीजिट,भेटी न देता ठेकेदार त्यांच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार निकृष्ट प्रतीची कामे करून घेत आहेत(कामे मंजूर होण्यापासून तर बिल काढण्या पर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत शेवट पर्यंत एकूण 40 ते 45 टक्के वाटप होत असल्याने प्रत्यक्ष कामाची टक्केवारी55 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे)काम झाल्यानंतर संबंधित काही ठेकेदार गुण नियंत्रक विभागाकडून किंवा संबंधित विभागाकडून गुणवत्तेचा दाखला घेतात त्यावेळेला गुणवत्तेचा दाखवा देताना संबंधित प्रत्यक्ष खात्री न करता बनावट दस्तऐवज तयार करून बनावट दाखले देत असल्याने ठेकेदारांच्या टक्केवारीला अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात असून याबाबत आमदार खासदार जिल्हा व तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक व इतर विविध काही संघटनांनी लक्ष केंद्रीत करून माहितगार ठेकेदारांना किंवा ज्या ठेकेदाराकडे बांधकाम करण्याबाबतचे संपूर्ण अत्याधुनिक साहित्य ज्यांच्याकडे आहे त्यांनाच कामे देऊन उत्कृष्ट प्रतीची गुणवत्तापूर्वक कामे करून घ्यावे किंवा निकृष्ट प्रतीची कामे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

हे देखील वाचा :