जळगाव जिल्हा

गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावचा प्रेशित वारके JEE Main मध्ये अव्वल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा जेईई मेनचा निकाल जाहीर झालेला असून गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा प्रेशित वारके जेईई मेन दुसर्‍या स्तरांमध्ये ९९.६३% गुण मिळवून अव्वल आला आहे.

प्रेशीत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा बारावीचा विद्यार्थी तसेच गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च तथा गोदावरी फॉउंडेशचे मॅनेजमेंट गुरू डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. नीलिमा वारके यांचा चिरंजिव ९९.६३% गुण मिळवून बाजी मारली आहे. प्रेषितने पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष .डॉ. उल्हास पाटील , सचिव डॉ. वर्षा पाटील , संचालिका डॉ.केतकीताई पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या, सौ. निलिमा चौधरी , तसेच सर्व शिक्षक वृंदांनी प्रेषितचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आणि पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी व यशस्वीतेसाठी आशीर्वाद दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button