⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | 60 हजाराची लाच घेतना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

60 हजाराची लाच घेतना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । चाळीसगावातील 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला 60 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना आज सोमवारी रात्री ८ वाजेल घडली. यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुश्ताक मोतेबार सैय्यद (घाट रोड, चौधरीवाडा, चाळीसगाव) असे लाचखोर डॉक्टरचे नाव आहे.

चाळीसगावातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) आहे. कोरोना काळात कोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड्यातून तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांच्या सेवेच्या मोबदल्यात शासनाकडून बिल मिळणार असून या बिलांची पडताळणी करून त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव यांचे सही-शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव यांच्याकडून पडताळणी करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी डॉ.मुश्ताक मोतेबार सैय्यद यांनी सोमवारी लाच मागितली होती. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.