जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । चाळीसगाव महावितर कंपनीच्या कार्यालयात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हा प्रकार लक्षात येताच उपस्थिती पोलिसांनी त्या व्यक्तीला रोखले.

याबाबत असे की, महावितरण कंपनीचे नामांकित कॉन्ट्रॅक्टर यांनी महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून कर्तव्यातून कमी करीत, त्यांची तीन महिन्याचे वेतन देखील दिले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कार्यालयात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.
यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्याच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून त्यांची अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली. यावेळी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.