⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

येवती येथे कंटेनर सर्वेक्षण, विविध विषयांवर मार्गदर्शन ‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । जामठी‎ बोदवड तालुक्यातील येवती येथील ‎प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच ‎राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात ‎आला. यात येथील आरोग्य केंद्राचे ‎वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनाथ‎ चौधरी व डॉ.विरेंद्र पाटील यांच्या ‎मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम ‎राबवून, जनजागृती करण्यात आली. ‎ ‎

तसेच गावात कंटेनर सर्वेक्षण‎ करण्यात आले.‎ डेंग्यू आजार पसरवणाऱ्या‎ डासांची उत्पत्ती कशी होते तथा या‎ वर कशा प्रमाणे नियंत्रण आणले‎ जाऊ शकते याबाबत सखोल असे‎ मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य‎ विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.‎ श्रीनाथ चौधरी यांनी केले. घराच्या‎ आजुबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ‎ करून टायर, नारळाच्या करवंट्या,‎ ‎फुटलेली भांडी, तथा अन्य वस्तू‎ घराच्या आजुबाजूला पडलेल्या‎ असल्यास, त्या त्वरीत नष्ट कराव्या.‎ तसेच घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.‎ त्यामुळे अशा वस्तूंमध्ये पावसाचे‎ पाणी साचून डेंग्यूच्या डासांची‎ उत्पत्ती होणार नाही. हे डास स्वच्छ‎ पाण्यातच तयार होतात. त्यामुळे‎ आठवड्यातून एक दिवस कोरडा‎ दिवस म्हणून पाळावा मार्गदर्शन‎ करण्यात आले. डाॅ. श्रीनाथ चौधरी‎ यांनी केले. डाॅ.विरेंद्र पाटील,‎ के.पी.शहाणे, आरोग्य सहाय्यक‎ एस.एस.पाटील, आर.बी.सरताळे,‎ गजाजन माळी, के.जी.कुवारे,‎ योगेश इंगळे उपस्थित होते.‎