गुन्हेजळगाव जिल्हा

Breaking : 50 हजारांची लाच स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशनचा हवालदार जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । लाचखोरीची एक मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशनच्या हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी रंगेहात अटक केली. किरण रविंद्र पाटील (वय 41) असे लाचखोर हवालदाराने नाव असून या करवाईने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

काय आहे प्रकार?
भडगाव शहरातील 28 वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलिसात अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे. तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 रोजी आरोपी हवालदाराने दोन लाख 60 हजारांची लाच मागितली होती.

या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. लाचेतील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50 हजार रुपये घेताना हवालदार किरण पाटील यास आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button