ऐन निवडणुकी तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार ! ‘हा’ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

डिसेंबर 17, 2025 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु असताना अशातच हिंगोलीत भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय.. माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

bjp congress jpg webp

भाजप प्रवेशासाठी प्रज्ञा सातव मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आजच सकाळी मुंबईत पोहचले. या कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे महापालिका निवडणुकीची घोषणा झाली असताना ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या १८ डिसेंबर रोजी भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार प्रज्ञा सातव यांचा पक्ष प्रवेश 11 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now