जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । भारतात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी दिसून येते. देशात आता सणासुदीला सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष गाड्या सोडल्या जात आहे. याच दरम्यान, दक्षिण रेल्वेने जळगाव मार्गे कोइम्बतूर-जयपूर-कोइम्बतूर दरम्यान रेल्वे सुरू केली आहे. यामुळे जळगावकरांना उत्तर व दक्षिण भारतात जाण्याची सोय झाली आहे.

कोइम्बतूर- जयपूर वेळापत्रक
रेल्वे क्रमांक ०६१८१ कोइम्बतूर-जयपूर विशेष गाडी ७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ती ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. ही ट्रेन प्रत्येक गुरुवारी कोइम्बतूर येथून पहाटे २:३० वाजता सुटेल आणि जयपूर येथे शनिवारी दुपारी १:२५ वाजता पोहोचेल. दरम्यान ही ट्रेन दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटाने भुसावळ स्थानकावर तर जळगावला दुपारी २ वाजून १० मिनिटाने पोहोचले.

जयपूर-कोइम्बतूर वेळापत्रक
गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर-कोइम्बतूर विशेष गाडी १० ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन जयपूर येथून दर रविवारी रात्री १०:०५ वाजता सुटेल आणि कोइम्बतूर येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटाने जळगावला पोहोचले, तर रात्री ८ वाजून ५ मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल.
या स्थानकांवर असणार थांबा?
या गाडीला तिरुपूर, इरोड, सालेम, जोलारपेट्टी, काटपाडी, रेणुगुंता, कडापा, येरगुंतला, गुटी, ढोणे, करनूल सिटी, गडवाल, मेहबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वरोदरा, गोधरा, रतलाम, जावरा, मंदसोर, निमच, चितोरगढ, चंदेरिया, भिलवाडा, बजरंगनगर, नाशिराबाद, अजमेर आणि किशनगढ या ठिकाणी थांबे आहेत.
या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून १८ डब्बे असतील.











