Friday, December 9, 2022

लिपिकाने घेतली लाच : जामनेर बीडीओंना एसीबीची नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । जामनेर येथील पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक वसंत बारी याला तीन हाजराची लाच घेताना १३ जानेवारीला अटक केली असताना याच प्रकरणी आता गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांनाही गुरूवारी एसीबीने नोटीस बजावली आहे. शुक्रवारी चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसीबीच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

याबाबत असे की, गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी जामनेर येथील पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक वसंत बारी याने तीन हजाराची लाच मागितली होती. लाच घेताना एसीबीच्या पथकाने १३ रोजी अटक केली होती. याच प्रकरणात गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांनाही गुरूवारी एसीबीने नोटीस बजावली आहे.

जामनेर पंचायत समितीत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर १३ रोजी गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी, तीन हजार रूपयांची लाच घेतांना कनिष्ठ सहाय्यक बारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. तर २० रोजी बीडीओ जे.व्ही.कवडदेवी यांनाही एसीबीने नोटीस बजावली असून, शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले अाहेत.

- Advertisement -

एसीबीच्या कारवाईनंतर बीडीओ कवडदेवी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याच्या हालचाली पदाधिकाऱ्यांनी चालवल्या आहेत. तर कवडदेवी यांनी १५ दिवसांच्या सुटीसाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवला आहे.

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]