अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर; सुधारित वेळापत्रक असे..?

जून 10, 2025 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२५ । राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन खूप दिवस झाले आहेत. मात्र आता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे वे अलाइनमेंट 26 जूनला प्रसिद्ध होणार आहे.

student

राज्यातील जुनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणारे अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली. अलाइनमेंट यादीत नाव प्रसिद्ध होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 जून ते तीन जुलै या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी पाच जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेल्या बारा लाख विद्यार्थ्यांना प्रवेशांचा आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरीवाटप 12 ते 14 जून
प्रवेश फेरी १चे वाटप करणे 26 जून
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 27 जून ते 3 जुलै
प्रवेश फेरी दोन साठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे पाच जुलै

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment