⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

एरंडोल शहरात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । एरंडोल शहरात लसीकरण वाढावे यासाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनातर्फे घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी शहरातील मस्जिद अली परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एरंडोल शहरात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दहा ठिकाणी लसीकरणाचे बूथ लावण्यात आले होते. त्यानुसार शहरातील मस्जिद अली परिसरात कोरोना लसीकरण वाढावे यासाठी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, नगरसेवक मनोज पाटील, डॉ.सुरेश पाटील, असलम पिंजारी, मजीद अली आदींनी परिसरातील नागरीकांच्या घरी जावून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले. त्यास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
शहरात कोरोना लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण दहा पथक स्थापन करण्यात आले असून लसिकरणासाठी डॉ.अमोल पाटील, सीएचओ योगिता पाटील, शरद राजपूत, अशोक मोरे, विनोद जोशी तसेच परिसरातील नागरिक यांचे सहकार्य लाभले.