लेवा पाटीदार आयोजित प्रीमियर लीगमध्ये पहिल्या दिवशी चुरशीचा सामना!
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक सीजन थ्री अंतर्गत बदल प्रीमियर लीगमध्ये पहिल्या दिवशी चुरशीचे सामने बघायला मिळाले. पहिल्याच सामन्यात बलाढ्य अस्मि एकर्स संघाने ठेवलेले १६६ धावांचे लक्ष्य सोयो सनरायडर्स संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत आव्हान कायम ठेवून जिंकले.
अखेरच्या चेंडूत ३ चेंडूत १५ धावा आवश्यक असताना सामनाविर जयेश नारखेडे याने सलग तीन षटकार लगावत हा सामना संघाला जिंकून दिला. यानंतर भूमी वॉरियर्स संघाने दिलेले १२४ धावांचे लक्ष्य धनंजय ऍग्रो संघाने नवव्या षटकांतच पूर्ण केले.
त्यानंतर एकनाथ ऑटो रायडर्स संघाने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी पंकज भुसावळ संघाने नवव्या षटकातच पूर्ण केले. वरणगावच्या जेडी इलेव्हनने पद्मालय संघाला दिलेले १०७ धावांचे लक्ष कमी षटके राखून गाठलं. यामध्ये नरेंद्र पाटील हा खेळाडू सामनावीर ठरला तर गोदावरी फायटर्स विरुद्ध विघ्नहर्ता इलेव्हन सामन्यात गोदावरीने दिलेले १३६ धावांचे लक्ष विघ्नहर्ताने ४९ चेंडूतच गाठून घेतले. यामध्ये २५ चेंडूत ६८ धावा करणारा कौस्तुभ पाटील सामनावीर ठरला.
यानंतर सहावा सामना वरणगाव इलेव्हन आणि अस्मि एकर्स यांच्यात झाला. यामध्ये अस्मि एकर्सने पुन्हा एकदा दहा षटकात द्विशतक करीत २०७ धावांचे लक्ष्य वरणगाव संघासमोर ठेवले. परिणामी वरणगाव संघ ते पेलू शकला नाही.
अस्मि एकर्सतर्फे प्रफुल्ल चिरमाडे याने ३० चेंडूत ९८ धावा तर विनय खडके याने ६४ धावांचे योगदान दिले.
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन