⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चोपड्याच्या आमदार सोनवणे कोरोना बाधित, चाळीसगावात महिलेचा मृत्यू

चोपड्याच्या आमदार सोनवणे कोरोना बाधित, चाळीसगावात महिलेचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात मंगळवारी दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून एक रुग्ण जळगाव ग्रामीण मतदार संघातील आहे तर दुसरा रुग्ण चाेपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता साेनवणे या आहेत. दरम्यान, चाळीसगाव येथील एका ६० वर्षीय महिलेचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्याने धोका अद्याप कायम असल्याचे दिसून येते.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी नुसार, मंगळवारी दिवसभरात भडगाव तालुक्यातील एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले असून, सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी जिल्ह्यातील सहाही रुग्ण हे लक्षणे नसलेली असल्याने व होम आयसोलेशनमध्ये असल्याने चिंता कमी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ९८.१८ टक्क्यांवर कायम आहे.

चोपड्याच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचा मंगळवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पती व मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तपासणी करण्यात येत असून, गेल्या तीन ते चार दिवसांत बैठका, कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या व्यक्ती आमदार सोनवणे यांच्या संपर्कात आल्या असतील अशा सर्व व्यक्तींनी स्वतःहून कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. कोरोना बाधित असल्याने आ.लता सोनवणे आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार आहेत.

चाळीसगाव येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज एक-दोन रुग्ण आढळून येत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.