जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चिंतेचा बनत आहे. अशातच जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, चिंचखेडा तवा येथील भागवत राजाराम साठे (वय ३५) या शेतकऱ्याकडे साडेचार एकर जमीन आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेसह अन्य ठिकाणांहून कर्जाची उचल केली होती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असतांनाच, कर्जवसुलीसाठी तगादा सुरू होता.

त्यामुळे साठे यांनी कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- भुसावळात दामिनी पथकाची शाळा-कॉलेज परिसरात धडक मोहीम; विद्यार्थिनींशी साधला संवाद
- ट्रम्प यांच्या ‘इराण करारा’मुळे कच्चे तेल कोसळले! आता भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?
- Bhusawal : प्रा. धिरज पाटलांचा महावितरणला खडा सवाल; ग्राहकांचे पैसे रोखून स्मार्ट मीटरने वीज कापण्याचा अधिकार कुणी दिला?
- शेतकऱ्यांची चिंता वाढली! केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने कापसाचे दर घसरले; नव्या हंगामावर संकटाचे सावट
- आजपासून जळगावातील शाळा गजबजल्या; ढोल-ताशांचा गजर, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत











