Crime : १० रुपये देत तब्येत ठीक करण्याच्या बहाण्याने चिमुकलीचा विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । चाळीसगावच्या एका परिसरात चिमुकलीला १० रुपये देत तब्येत ठीक करण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसांत संशयित आरोपी विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 30T160214.720 jpg webp

चाळीसगावच्या एका परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून संशयित आरोपीने चिमुकलीला १० रुपये देत तब्येत ठीक करण्याच्या बहाण्याने घरात बोलून विनयभंग केला. याबाबत पीडित चिमुकलीच्या आईने शहर पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी पोनी के.के. पाटील यांनी भेट दिली.

त्यानुसार भा.कलम ३५४,कायदा २०१२ चेककलम ८,१२ प्रमाणे संशयित आरोपी राम प्रकाश केदार (वय २१) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दीपक बिरारी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now