⁠ 
शनिवार, मे 4, 2024

आ. चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांमुळे विद्युत जनिञे व विद्युत पोल हटवण्याचा मार्ग खुला

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे म्हसावद रस्त्यावरील २ विद्युत जनिञे व ६ विद्युत पोल स्थलांतरासाठी कंञाटदाराकडून हालचाली सूरू झाल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आता जवळपास अडीच वर्षांपासून विज वितरण मंडळाच्या सब्स्टेशन पासून ते म्हसावद नाक्या पर्यंतचे राज्य महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम हे रखडलेले होते.

म्हसावद राज्य महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम नेरी गावापासून सूरू झाले होते पण एरंडोल शहरानजिक डि. डि.एस.पी महाविद्यालयाची नवी इमारत व सब्स्टेशन पासून ते म्हसावद नाका पर्यंत २ जनिञे व ६ विद्युत पोल रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होते त्यामुळे सुमारे ३किलोमीटर च्या रस्त्याच्या कामाला ब्रेक लागल्यामुळे परीणामी वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते.तसेच छोटे-मोठे अपघात ही या महामार्गावर घडलेले आहेत.

आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालुन रस्त्याच्या कामास गती देण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंञणेला केली आहे.