जळगावच्या आव्हाण्यातील सुनील चौधरींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । राज्य शासनाने नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा विधेयकाला मंजूरी दिली असून, सोमवारी या प्रस्तावावर विधानसभेच्या आधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अंबरनाथ नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा उल्लेख केला असून, अंबरनाथ नगरपालिकेतंर्गत सुनील चौधरींनी केलेल्या कामांचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेले सुनील चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील रहिवाशी असून, काही वर्षांपासून ते अंबरनाथला स्थायीक आहेत. सुनील चौधरी हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सुनील चौधरी यांनी अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. विशेष म्हणजे सुनील चौधरी संपुर्ण बालपण आव्हाणे गावातच गेले असून, जळगाव मनपातील सत्तांतराच्या वेळेस देखील एकनाथ शिंदे यांनी सुनील चौधरींवर मोठी जबाबदारी सोपविली होती.