भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

जून 13, 2025 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२५ । भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन प्रमुख रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मध्य रेल्वेने बदल केला आहे. पुरी -एलटीटी-पुरी एक्सप्रेस (२२८६६- २२८६५) आणि पुरी साईनगर शिर्डी-पुरी एक्स्प्रेस (२०८५७ २०८५८) या गाड्यांमध्ये सुधारित डब्यांची रचना लागू करणार आहे.

train 3 jpg webp

यात आता एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक पैंट्री कार आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन (सामान्य द्वितीय श्रेणीसह) असतील. ही सुधारित रचना पुरी- एलटीटी-पुरी एक्स्प्रेस पुरी येथून ५ ऑगस्ट रोजी तर एलटीटी येथून ७ऑगस्ट रोजी पुरी-साईनगर शिर्डी-पुरी एक्स्प्रेस पुरी येथून ८ ऑगस्ट साईनगर शिर्डी येथून १० ऑगस्ट रोजी सुटणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल”

  1. MSEDCL Jalgaon under Bhusawal division madhil electricity consumers che without meter reading che electricity bill last 2 months issued hota aahet. Earlier practice nusar Auto metet reading suru karnyat yeyil ka yacha khulasa karava.

Leave a Comment