⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

मोठी बातमी ! 12वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नव्या तारखा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये (HSC Board Exam TimeTable) अंशतः बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत.

बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे. तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील

बोर्डाने असे कळवले आहे की बारावीच्या लेखी परीक्षा आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील वरील अंशत: बदलाची सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच पालक-विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

हे देखील वाचा :