जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी कोरोना काळापूर्वी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस धावत होती. मात्र गेली अडीच वर्षाहून अधिक काळापासून ही गाडी बंद होती. नंतर ही गाडी आता अमरावती-पुणे अशी धावत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अमरावती-पुणे आणि अमरावती-अजनी एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल केला आहे. या गाडीला आता वाढीव १ स्लीपर आणि १ एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच जोडण्यात येणार आहे.

सुधारित रचना अशी : जनरेटर- १, स्लीपर- २, एसी चेअर कार- १, नॉनएसी चेअर कार-१०, एसी थ्री टायर इकॉनॉमी- १ आणि गार्ड ब्रेक यान-२ एकूण १६ एलएचबी कोच असणार आहेत.
पुणे-अमरावती (गाडी क्रमांक ११०२६) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६)पासून, तर अमरावती-पुणे (गाडी क्रमांक ११०२५) एक्स्प्रेसला शुक्रवार (ता. १५)पासून, अमरावती-अजनी (१२११९) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६), अजनी-अमरावती (१२१२०) एक्स्प्रेसला शनिवार (ता. १६)पासून संरचनेत बदल करण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.