---Advertisement---
बातम्या वाणिज्य

केंद्र सरकारकडून पेन्शनच्या नियमांमध्ये बदल ; महिलांना होणार मोठा फायदा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलत्या नियमानुसार आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकतात.

pension

घटस्फोटित आणि विभक्त झालेल्या महिलांना त्यांच्या मृत पालकांचे कौटुंबिक पेन्शन मिळविण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला पण, आता सरकारने कुटुंब पेन्शनचे नियम बदलले. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबद्दल माहिती दिली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पेन्शनशी संबंधित अनावश्यक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पेन्शन सुधारणांची घोषणा केली आहे.

---Advertisement---

पेन्शनच्या नियमांमध्ये बदल
घटस्फोटित किंवा वेगळी राहणारी मुलगी
जर मुलीचा घटस्फोट झाला असेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर ती पेन्शनसाठी दावा करु शकते. जर वडिलांच्या हयातच मुलीच्या घस्फोटाची प्रक्रिया सुरु असेल तरीही ती यासाठी पात्र आहे.

महिला पेन्शनर्स
महिला पेन्शनर्स आता आपल्या मुलांना नॉमिनी बनवू शकतात. जर महिलेने कोणतीही हिंसाचाराची किंवा हुंडा अशासंबंधित खटला दाखल केला तर त्या मुलांना पेन्शनसाठी प्राथमिक दावेदार बनवू शकतात.
जर कोणत्याही विधवा महिलेने दुसरे लग्न केले तर तिला तिच्या आधीच्या पतीची पेन्शन मिळत राहणार आहे.

महिलांसाठी नियम
पेन्शन व्यतिरिक्त महिलांना अनेक सुविधादेखील दिल्या जातात.
बालसंगोपनासाठी रजा
सिंगल मदरला दोन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने रजा मिळते. ज्यामुळे मुलांना परदेशात प्रवास करण्याचीही परवानगी असते.
मातृत्व लाभ
याचसोबत गर्भपात झाल्यासदेखील भरपगारी रजा दिली जाईल.
याचसोबत सरकारी कार्यालयांमध्ये वसतिगृहे, पाळणाघरे अशा सुविधा दिल्या जातील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment