पिंप्राळा विकास सोसायटी निवडणुकीत ५२ वर्षानंतर सत्ता परिवर्तन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । गेल्या ५२ वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या पिंप्राळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणुक यावर्षी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पॅनल उभे केल्यामुळे अत्यंत चुरशीची झाली. सावखेडा येथील उत्तम चौधरी यांच्या शेतकरी विकास पॅनल विरूध्द उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे शेतकरी प्रगती पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

पिंप्राळ्याचे जेष्ठ नगरसेवक आबा कापसे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक अमर जैन यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली होती. रविवारी सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात उत्तम चौधरी यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. कुलभूषण पाटील व अमर जैन यांच्या शेतकरी प्रगती पॅनलच्या १३ पैकी ९ जागा विजयी झाल्या आहेत.

या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार गटातून शेतकरी प्रगती पॅनल प्रमुख कुलभूषण विरभान पाटील, संजय सखाराम महाजन, दिपक गोपलदास मुंदडा, अनिल भिमसिग पाटील, पांडुरंग उदेसिग पाटील, राहुल राजेंद्र पाटील, पंकज रविंद्र सोमाणी, इतर मागासवर्गीय गटातून जितेंद्र पांडुरंग पाटील, अनुसूचित जाती जमाती गटातून चंद्रकांत उत्तम सोनवणे आदी उमेदवार विजयी झाले आहेत.


सदर निवडणुकीसाठी विष्णू पाटील, माजी पो.पा. जगन्नाथ महाजन, पुरुषोत्तम सोमाणी, धरमसिग पाटील, यशवंत बारी, आनंदा धनगर, भागवत धनगर, दगडू साळवी, राजमल जखेटे, संजय सोमाणी, अमर जैन, ईश्वर राजपूत व गावातील जेष्ठ नागरिकांचे सहकार्य लाभले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक पाटील यांनी कामकाज पाहिले.