⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Yellow Alert : अक्षय तृतीयापासून चार दिवस उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये ३ मे पासून पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशासह राज्यात यंदाच्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच तापमानाचा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर एप्रिल महिना हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्यामुळे मे महिना कसा जाईल याची चिंता नागरिकांना लागलीय.

अशातच मे महिन्याचा पहिला आठवडा उष्णतेपासून दिलासा देणारा असू शकतो. कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. राज्यातील उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्हा वगळता धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये ३ मे पासून ते ६ मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.