जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । परिस्थितीवर मात करून अनेक लोक जगत असतात यातीलच एक कुटुंब शहरातील प्रमोद पाटील यांचं आहे. प्रमोद पाटील व त्यांची पत्नी यांच्या वाटेवर अंधत्व आलेलं असून आता मात्र त्यांच्या मुलाने आयुष्यभर अंधःकाराला सामोरे नको जायला म्हणून या कुटुंबाची धावपळ सुरु आहे. याच बाबत या परिवाराच्यावतीनं सर्वाना मदतीची विनंती करण्यात येत आहे.

शहरातील प्रमोद पाटील व त्यांची पत्नी पूनम प्रमोद पाटील हे दोघेही अंध जोडपे आहे. त्यांना एक लहान मुलगा असून जेनेटिक हिस्ट्री मुळे पुत्रही अंध जन्माला आला मुलाला पुढील औषधे उपचारासाठी हैदराबाद येथे जावे लागत असते. त्याचे आतापर्यंत सात ऑपरेशन्स केली आहेत. उपचारामुळे पाटील दाम्पत्याचा मुलगा आता 80 टक्के पर्यंत बघू शकत आहे. मुलाची अजून उपचार सात महिन्यांपर्यंत करायची असून यासाठी आर्थिकदृष्ट्या पाटील दांम्पत्य कमजोर पडत आहे.

यामुळे मदतीसाठी त्यांनी आवाहन केले आहे. मुलाच्या डोळ्यांचा उपचार हैदराबाद येथे चालू आहे तथापि आता ऑपरेशन निमित्त मुलगा हैदराबाद येथे आहे प्रत्येक ऑपरेशनला 30 ते 35 हजार खर्च येतोय. काही मदत आतापर्यंत मिळाली आहे. तरी उर्वरित काही रकमेसाठी त्यांना समाजातील लोकांची अत्यंत गरज आहे तरी आपण सर्वांनी लहानग्याच्या भावी आयुष्याची दिवाळी उज्वल जावी म्हणून मदतीचा हातभार लावावा व हि बातमी जास्त जास्त शेअर करावे. ही नम्र विनंती. मुलाच्या मदतीसाठी ची माहिती खालील प्रमाणे आहे
मदतीसाठी – गुगल पे / फोन पे / पेटीएम / ॲमेझॉन पे नंबर – 9766407085
नाव – समाधान पाटील
Paytm payments Bank account holder name – Pramod Bhagwat Patil
Account No. 919309554550







