जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात अनेकांना गंडविण्यात आले आहे. अशीच एक घटना आता जळगाव जिल्ह्यातून समोर समोर आलीय. ज्यात भारतीय सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विजय चिंधा राजपूत (४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की,चाळीसगाव येथील विजय राजपूत हे भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. दरम्यान जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून ७ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे असल्याची विचारणा केली. मात्र विजय राजपूत यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मात्र १ जुलै रोजी त्यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.

ऑनलाईन कर्ज काढत रक्कम काढली
हा प्रकार घडल्यानंतर सायबर गुन्हेगाराने विजय राजपूत यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. यानंतर परस्पर राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेतले. हि सर्व रक्कम सायबर गुन्हेगाराने आपल्या वेगवेगळ्या खात्यात वळती केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजपुरी यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.












