जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्व सामान्य नागरिक यांच्या स्मरणार्थ चाळीसगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन कारण्यातर आले असून जळगाव जिल्हा पोलीस उपअधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतुन उद्घाटन पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिर दिनांक २६/११/२००८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व सर्व सामान्य नागरिक यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन जळगाव जिल्हा पोलीस उपअधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतुन उद्घाटन पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, सचिन कापडणीस, सागर ढिकले, विष्णु आव्हाड, पि एस आय अमोल पवार व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संविधान शपथ वाचन केले.