ब्लॅकमेलिंग प्रकरण : चाळीसगावच्या ‘त्या’ तरुणाचा मोबाईल उघडताच पोलिसांनाही बसला धक्का!

मे 6, 2026 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून तब्बल ८ लाख रुपये उकळणाऱ्या चाळीसगाव येथील यश महेंद्र जैन या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटकेनंतर पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली, तेव्हा त्यात इतरही काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो मिळून आले आहेत. या खळबळजनक प्रकरणाने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

crime

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यश जैन याने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून त्याने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने त्याला वेळोवेळी तब्बल ८ लाख रुपये दिले. मात्र, आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी यश जैन याला बेड्या ठोकल्या.

चाळीसगावातील या ब्लॅकमेलिंग प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची प्राथमिक तपासणी केली असता, त्यात फक्त एकाच नाही, तर इतरही काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी यश महेंद्र जैन याला न्यायालयात (कोर्टात) हजर केले असून, पोलीस या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now