वर्षभरापासून रेल्वे पॅसेंजर बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल

मार्च 13, 2021 9:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर  गेल्या वर्षभरापासून सर्व रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. परिणामी अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

भुसावळ, जळगाव येथून सुरतकडे जाणारे अनेक प्रवासी असतात. त्यात नोकरीच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो आहे.

या पार्श्वभूमीवर डीआरएम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल. तसेच रेल्वे मंत्र्यांनाही एक निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जगन सोनवणे यांच्याकडून कळवण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now