जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील सुयोग महिला मंडळाने चैत्रगौरीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध कलागुण दर्शन कार्यक्रमातून महिलांनी आपली कला सादर केली.
अभिनेत्री रत्ना दहिवेलक, सविता नावरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सविता नावरकर यांनी महिलांनी व्यक्तिगत विकास घडवून आपल्या अस्तित्वाची ओळख कुटुंब सांभाळून कशी निर्माण करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. रत्ना दहीवेलकर यांनी स्त्री अशी मी, कशी मी यावर आपली कला जोपासून आपल्याला कलाक्षेत्रात सातत्य ठेवून आपला विकास व स्पर्धा कशी टिकवून ठेवता येईल, यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कोणतेही काम व कला कशी सर्वश्रेष्ठ आहे हे सांगून महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले. निवेदन डॉ.दिपाली शेंडे यांनी केले. तसेच सुयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला ब्राह्मणकार यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी विविध खेळ खेळले. मंगला ब्राह्मणकर, शकुंतला येवले, पुष्पा भामरे, ममता अमृतकर, वर्षा कुडे, छाया कोठावदे, जयश्री येवले, पुष्पा नेरकर, रजनी येवले, उज्वला शिरोडे, रेखा मोराणकर, सरला तलवारे, शारदा कोठावदे, रेखा माकडे यांच्यासह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.