सोमवार, डिसेंबर 4, 2023

मध्य रेल्वेचा LTT-नागपूर एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय, भुसावळसह ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई लोकमान्य टर्मिनल ते नागरपू एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष ट्रेन नाशिक, भुसावळ, बडनेरा मार्गे 17/06/23 रोजी धावेल.यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे 17/06/23 रोजी विशेष ट्रेन 02139 LTT-नागपूर एक्स्प्रेस चालवणार आहे. ही ट्रेन मुंबई लोकमान्य टर्मिनल हुन रात्री 12.50 मिनिटाने सुटेल. त्याच दिवशी दुपारी 15.32 मिनिटाने नागपूरला पोहोचेल.

या स्थानकांवर थांबेल?
ही ट्रेन ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, धामणगाव, बडनेरा, वर्धा या स्थानकावर थांबेल.