⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुख्याधिकाऱ्यांनी केली शतवृक्ष लागवड

मुख्याधिकाऱ्यांनी केली शतवृक्ष लागवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । दिवसेंदिवस ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल टिकवुन ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनाच्या गरजेचे महत्व काही मोजकेच लोक जाणतात. वृक्षसंवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असली तरी याबाबत जागरुकता दाखविणाऱ्यांची संख्या कमी असून वनसंवर्धनाचे हित लक्षात घेत अनेक जण स्वत:हुन स्वखर्चाने वृक्षलागवडीकडे कलताहेत. सध्या पावसाळा सुरू असुन सद्यस्थितीत वाढदिवस असणाऱ्यांकडुन मोठ्या आवडीने वृक्ष लागवड केली जात आहे. मुक्ताईनगर येथे काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी दाभाळे यांनी वाढदिवसानिमित्त रूईखेडा पशुवैद्यकीय दवाखाना परीसरात वृक्षलागवड केली होती. त्यांच्या या स्त्युत्य उपक्रमांची दखल घेत “जळगाव लाईव्ह न्युज” ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताबाबत वन्यप्रेमीकडुन कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान असाच स्त्युत्य उपक्रम मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी भोसले यांचा मुलगा राघव चंद्रकांत भोसले या बाळाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वखर्चातुन शहरातील प्रभाग १३ व इतर अन्य ठिकाणी मोकळ्या जागेत तब्बल १०० वृक्ष लागवड केली.

कडुनिंबाची १० झाडे, केशर आंबा १५, तोतापुरी आंबा १५, आवळा १०,जामुन ३०,सिताफळ ५,नारळ ५,सयतुल १० अशा विविध प्रजातीच्या झाडांची लागवड केली. त्यांच्या या वृक्षसंवर्धनाच्या कार्याबद्दल परीसरातुन कौतुक होत असुन दरवर्षी असाच वृक्षलागवडीचा उपक्रम राबवणार असल्याचे कळते. अशा प्रकारे सर्व नागरीकांनी आपापल्या आप्तस्वकीयांचे वाढदिवस पाश्र्चात्य पद्धतीने साजरे करण्यापेक्षा पर्यावरणपुरक साजरे करण्याचा संकल्प करुन आपल्या पर्यावरणाची जाणीव ठेवुन सर्व नागरीकांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन अश्विनी गायकवाड (भोसले) यांनी आपुलकीने शहरवासीयांना केले. वृक्षलागवड करतांना नागरीकांची उपस्थिती होती. या पर्यावरण पुरक उपक्रमाबाबत कौतुक होत आहे.

यावेळी उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, सा.बां.सभापती तथा नगरसेवक संतोष मराठे, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, निलेश शिरसाट, अनिल पाटील, नुर मोहम्मद खान, युनुस खान, प्रविण पाटील, अभियंता राहुल मापारी, लेखपाल श्रीपाद मोरे, कर निरीक्षक अच्युत निलकंठ, सचिन कोठाके, संजु सोनार, सागर पुनासे, गोपाल लोहारे आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह