गुरांची चोरी करणारी टोळी गजाआड

जुलै 29, 2022 2:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । गुरांची चोरी केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत दाखल गुन्ह्यातील टोळीला पडकण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यात तब्ब्ल सहा जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

jalgaon 3 1

शेख इम्रान शेख ईसा, शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान, शेख उमेर शेख ताहीर, सर्फराज बिलाल खाटीक, शेख सत्तार शेख ईसा, शेख इरफान शेख ईसा (सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खेर्डे, वाघळी शिवार, वडाळी वडाळी, न्हावे, जावळे, रोकडे फाटा, पिंपळवाड निकुंभ आदी गावातून एकुण 20 गुरे चोरुन नेल्याचे या टोळीच्या माध्यमातून उघडकीस आले आहेत.

याशिवाय सोनगाव पोस्ट खेर्डे येथील ममराज जाधव यांनी 13 जुलै रोजी दाखल केलेला गुरे चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अटकेतील गुन्हेगारांकडून आठ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप व्हॅन असा 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now