जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील पिंप्राळा परिसरात घरातून सोन्याचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, कडोबा त्र्यंबक सुर्यवंशी (वय-४६) रा. शिंदे नगर, पिंप्राळा हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दि १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १७ एप्रिल सकाळी ११ वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून सुमारे २३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १० हजाराची रोकड असा एकुण ३३ हजाराचा मुद्देमाल चोरीस नेला. याप्रकरणी कडोबा सुर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून दि २० एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे हे करीत आहेत.