जळगावातील शनीपेठेतून मध्यरात्री गाय चोरली, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । शहरातील शनीपेठ परिसरात शनि मंदिरासमोरील गल्लीतून शुक्रवारी मध्यरात्री एक गाय चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरातील काही सीसीटीव्ही तपासले असता चोरटे चारचाकीतून आल्याचा अंदाज आहे.

शनिपेठ परिसरात राहणारे हर्षल ज्ञानेश्‍वर चौधरी (वय-२३) यांच्या मालकीची दीड वर्ष वयाची गाय त्यांनी गुरुवारी रात्री घरासमोर बांधलेली होती. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांचे काका हरी चौधरी यांनी पाहिले असता गाय त्यांना दिसून आली. शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी भाजी मार्केटला जायचे असल्याने हर्षल चौधरी हे उठले असता त्यांना गाय दिसून आली नाही. दिवसभर परिसरात आणि शहरात शोध घेतल्यानंतर गाय मिळून न आल्याने त्यांनी याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे तीन वाजेच्या सुमारास एक चारचाकी संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली आहे. चोरट्यांनी याच चारचाकीतून येत गाय चोरल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा :