जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । अमळनेरात दुकानांच्या छतावर नवजात बालिका गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत १८ रोजी आढळली होती. या बालिकेच्या माता-पित्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मंगळवारी बालिकेला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सविस्तर असे की, येथील १८ रोजी मंगळग्रह मंदिराजवळील एका दुकानाच्या छतावर नुकतेच जन्मलेल्या नवजात बालिकेला ठेवून, निर्दयी माता-पिता पसार झाले आहेत. शहरातील बालरोग तज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांनी बालिकेवर उपचार केले. महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे व रेखा ईशी यांनी बालिकेला खासगी दवाखान्यातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्या मुलीला महिला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात येणार आहे. हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे तपास करत आहेत. अद्याप पोलिसांना त्या मुलीचे निर्दयी माता पिता गवसले नाहीत. दोघांचा शोध घेतला जात आहे.
घटना सीसीटीव्हीत चित्रित
नवजात बालिकेला बेवारस सोडून पसार होणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. दुकानाच्या छतावर बालिकेला घमेलीत ठेवले होते. त्या घमेलीवर भावेश संजय धनगर असे लिहिले आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याच्या संबंधित ‘हा’ इतिहास तुम्हाला माहितीय का? मग जाणून घ्या..
- जळगावात प्रत्येक गाडीवर अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिराचे स्टिकर का लावले असतात? असा आहे इतिहास
- शेतकरी कर्जमाफी आणि महिलांना दरमहा २१०० रुपये ठरणार महायुतीचे ट्रम्पकार्ड
- काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजनांचा बोजवारा; भाजपाचा हल्लाबोल
- कुणाच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवायचा, महायुती का महाविकास आघाडी? प्रगती पुस्तक जारी