⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | आता चिंता नाही, जूनअखेर पुरेल हतनूरचा साठा, धरणात ५४.१२ टक्के साठा

आता चिंता नाही, जूनअखेर पुरेल हतनूरचा साठा, धरणात ५४.१२ टक्के साठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरासह विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्राची तहान भागवणाऱ्या हतनूर धरणात गतवर्षीपेक्षा यंदा १८.१२ टक्के जास्त जलसाठा आहे. यामुळे तापमानाची दाहकता अधिक असली तरी हतनूरमधून मागणीनुसार आवर्तन मिळेल. परिणामी यंदा मे महिन्यात देखील हतनूरवर अवलंबून असलेली गावे, शहरे व औद्योगिक प्रकल्पांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पाऊस लांबला तरीही हा साठा जून अखेरपर्यंत टिकून राहील.

११० गावांना हतनूर धरणाचा पाणीपुरवठा

भुसावळ शहरासह ११० गावांना हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात धरणाचा साठा झपाट्याने कमी होतो. यंदा सिंचन व बिगर सिंचनासाठी आवर्तन देवूनही धरणात ५४.१२ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी हा साठा ३६ टक्के एवढा होता. यंदा तुलनेत १८.१२ टक्के जास्त साठा आहे. यामुळे हतनूरवर अवलंबून असलेली ११० गावे, दीपनगर औष्णिक केंद्र, रेल्वे, आयुध निर्माणी, जळगाव, भुसावळ व मलकापूर एमआयडीसी, भुसावळ, अमळनेर, यावलसह पाच मोठी शहरांना मे महिन्यातही टंचाईच्या झळा बसणार नाहीत. याचे कारण म्हणजे गतवर्षी हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात उशिरापर्यंत पाऊस असल्याने धरणात आवक होत राहिली. त्यामुळे धरणातून सिंचन व बिगर सिंचनासाठी आवर्तन देवूनही सध्या ५४.१२ टक्के जलसाठा आहे. यंदा पावसाळा लांबला तरी हतनूर धरणातून जून अखेरपर्यंत गावे व प्रकल्पांची तहान भागवता येईल.

हतनूरमध्ये गतवर्षाच्या तुलनेत अधिक साठा आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत साठा उपयोगात येवू शकतो. आता बिगर सिंचन पाणीवापर संस्थांना एक आवर्तन दिले जाईल. मागणीनुसार ते वाढेल. योग्य नियोजन केल्याने पाण्याचा ताळमेळ साधता आला आहे. एस.जी.चौधरी, शाखा अभियंता,

author avatar
टीम जळगाव लाईव्ह