जळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देत ‘अरुण गवळी’ फरार

फेब्रुवारी 21, 2023 10:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या अरुण भगवान गवळी या आरोपीला पोलीस जिल्हा न्यायालयात हजर करत होते. लघुशंकेचा बहाणा करीत पोलिसांचे लक्ष चुकवून गवळी याने पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी वय-२२ रा.गुम्मी ता.जि.बुलढाणा याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोना काळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर करणार होते. पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला हजर करण्याकामी जिल्हा न्यायालयात घेऊन आले असता दुपारी ४.४५ च्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेचा बहाणा केला.

पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले आणि गुन्ह्याच्या केस वॉच यांना गुन्ह्यातील डी.एन.ए. अहवाल प्राप्त नसल्याबाबत कळवीत होते. पोलिसांची नजर चुकवून अरुण गवळी याने पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सचिन वाघ करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now