जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पारोळा शिवसेनेच्यावतीने महामार्गावर घोषणा देवुन राणेंच्या प्रतिकात्मक फोटोची जाळपोळ करण्यात आली. पारोळा तालुका शिवसेनेकडून पोलिस निरीक्षक यांना गुन्हे दाखल करणेबाबत निवेदन देण्यात आले.
केंद्रीय मंत्री राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत राज्याचे कुटुंब प्रमुख व देशात नावलौकीक मिळविलेल्या आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदर बाब ही निंदणीय असुन याचा पारोळा तालुका शिवसेनेने निषेध करुन पारोळा पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांना शिवसेनेच्यावतीने गुन्हा दाखलबाबत निवेदन देण्यात आले.
आंदोलनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जळुचे माजी सरपंच रविंद्र जाधव, राजु बागडे, युवा सेनेचे आबा महाजन यांचेसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.