⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वरणगाव शहरात घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका घरात चोरटयांनी डाव साधला आहे. यात सुमारे ६८ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेले आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत वरणगाव पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर शांताराम अवतारे (वय ७१, अयोध्या नगर, वरणगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अवतारे हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे वास्तव्यास आहे. दि. १३ रोजी अवतारे हे बाहेर गावी नेले होते. दरम्यान, बंद घर असल्याचे संधी हेरत डाव साधला. यात सुमारे ६८ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेले. अवतारे घरी आल्यावर ही घटना उघडीस आली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशीषकुमार अडसुळ करीत आहेत.

चोरट्यांनी कपाटातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, आठ हजार रुपये किंमतीच्या तोरड्या व अन्य दागिणे, बाळाचे कडे असा एकूण 68 हजारांचा ऐवज लांबवला. अवतारे गावाहून परतल्यानंतर चोरीची बाब उघडकीस आली.