जळगावात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जुलै 29, 2022 5:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे सूत्र सुरूच आहेत. शहरातील एका भागात काल रात्री चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 27T155414.941 jpg webp

मेहरून्नीसा शेख नियाजोद्दीन (वय ५६, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा तौफिक व सून हे दोघे नगरदेवळा ता. पाचोरा येथे कामाच्या निमित्ताने गेलेले होते. त्यामुळे मेहरून्नीसा शेख या शेजारी राहणारा पुतण्याकडे २८ जुलै रोजी रात्री झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराला कुलुप लावलेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शुक्रवार २९ जुलै रोजी सकाळी उघडकीला आले. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now