भुसावळात घरफोडी.. सोन्याच्या दागिन्यांसह ६६ हजारांचा ऐवज लांबवला!

सप्टेंबर 21, 2022 12:48 PM

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । भुसावळ शहरातील नुरानी नगर भागातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 66 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी 1.45 ते सायंकाळी पाच या काळात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime theft jpg webp

शेख नाजीम शेख लतीफ यांनी पोलिसांत फिर्याद दिली. शहरातील नुरानी नगरात शेख हे वास्तव्यास असून ते बाहेर गेले होते. दरम्यान, चोरट्यानी सोमवारी दुपारी 1.45 ते सायंकाळी पाच या काळात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व घरातील सोन्याचा हार, कानातील कर्णफूल, सोन्याची अंगठी असा सुमारे 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार जितेद्र पाटील पुढील तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now