Chalisagon : घरफोडीतील चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात

मे 23, 2025 3:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे बंद घर झाल्याचा फायदा घेत चोरट्याने दिवसाढवळ्या घरफोडी करत ३ लाख लाखो रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम लांबविल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु मेहूणबारे पोलिसांनी अवघ्या काही तासात घरफोडीचा छडा लावून आरोपीला मुसक्या आवळल्या आहे. प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, ता. जि. जळगाव) असं संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने वितळवून तयार केलेली लगडही जप्त केली आहे.

Deoli chori

या घटनेबाबत असे की, देवळी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी दीपक नामदेव पाटील हे आपल्या कुटुंबासह लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेसमधील लॉकर तोडून चोरट्याने ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

पाटील यांनी २० मे रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत केवळ ६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला.

अभिलेखावरील आरोपी प्रवीण पाटील यास या गुन्ह्यात निष्पन्न करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांडमध्ये घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने एका सराफाकडून वितळवून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून ३३ ग्रॅम वजनाची, ३ लाख २० हजार रुपये किमतीची वितळवलेली सोन्याची लगड जप्त केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment