बुलढाणा पुन्हा हदरले: दोन खासगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत 6 ठार, दोन्ही ट्रॅव्हल्सचा चक्काचूर, मृताचा आकडा वाढण्याची भीती?

जुलै 29, 2023 9:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 29 जुलै 2023 : बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महिनाभरातच बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसचा दुसरा भीषण अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

buldhana-accident

नेमकी घटना काय?

अमरनाथ येथून ३५ ते ४० प्रवाशांना घेऊन खासगी बस हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी दुसरी बस नागपूरवरून २५ ते ३० प्रवाशांनी घेऊन नाशिकच्या दिशेने येत होती.

दरम्यान, दोन्ही बस मलकापूर शहरातून हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकल्या असून यात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते २० ते २५ प्रवासी जखमी आहे.

हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही ट्रॅव्हल्सचा चक्काचूर झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आपल्या वाहनातून जखमींना घेऊन मलकापूर रुग्णालयात दाखल केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now