बीएसआर पक्षाची जळगावात झाली बैठक : वाचा काय आहे त्यांची रणनीती !
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । बीएसआर पक्षातर्फे महाराष्ट्र राज्यात केसीआर सरकारचा जनजागृती अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार गावागावात गाडी फिरून तेलंगणा शासनाचे लोकप्रिय योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचण्याचं व सभासद नोंदणीचे काम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यानमध्ये समनवयक करीत आहेत.
यासंदर्भात कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी दीपक प्रताप सिंग राजपूत उमरटी (चोपडा), कल्याण सिंग युवराज (खेडी, पारोळा) साहेबराव जुलाल पाटील (पारोळा) यांनी बीआरएसएस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे आप्पा समाधानभाऊ बाविस्कर, पत्रकार सतीश पाटील, कोमल पाटील, वर्षा चौधरी, पमाबाई पान पाटील, दीपक पाटील, निलेश महाजन, निळकंठ पाटील, विवेक रणदिवे,भिकन सोनवणे, नितीन तायडे, शिवाजी नाना, सुरेश राठोड, अनिल महाजन यांच्यासह आदी समन्वय हजर होते.