---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जळगाव एसटी पतसंस्थेत ॲड. सदावर्तेच्या पॅनलला धक्का

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । वर्षभरापूर्वी ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी कर्मचारी बँक तसेच एसटी कर्मचारी पतपेढीत निवडणुकीत बहुमताने सत्ता मिळवली होती. परंतु वर्षभरात संचालक मंडळात नाराजी व धुसफूस सुरू झाली. यातच ॲड. सदावर्तेच्या पॅनलला जळगाव एसटी पतसंस्थेत धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेचे १७ संचालकांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

sadavarte jpg webp

गेल्या काही दिवसापांसून एसटी को-ऑपरेटिव्ह बँक संचालक व एसटी कर्मचारी पतपेढीत संस्थेचे ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांचे पॅनल असलेले एसटी कष्टकरी जनसंघाच्या संचालक मंडळांनी सदावर्ते यांची साथ सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यानुसार एसटी कष्टकरी जनसंघाचे जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड जळगाव या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

---Advertisement---

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील बाळासाहेब भवनात जाहीर प्रवेश केला. यावेळी एसटी पतसंस्थेचे चेअरमन अमोल सुरळकर व कष्टकरी जनसंघाचे विभागीय सचिव मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बहुतांश संचालकांसह जळगाव विभागातील एरंडोल आगारातील राहुल पाटील राजपूत, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे आगार अध्यक्षपदाचा व सभासदत्वाचा राजीनामा देत व जळगाव विभागाचे कष्टकरी जनसंघाचे विभागीय कार्याध्यक्ष बी.एल. ब्रह्मे यांनी त्यांचा पदाचा व सभासदत्वाचा राजीनामा देत एरंडोल आगारातील २२५ कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश केलेला आहे. यात प्रभाकर मोरे, कैलास साबळे, सुकलाल सूर्यवंशी, दीपक कोळी आदी पदाधिकारी यांनी देखील जाहीर प्रवेश केलेला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---