⁠ 
शनिवार, मे 18, 2024

बंधुभाव : एरंडोलला गणेशोत्सवात मुस्लिम ढोलकी वादकाकडून धार्मिक सद्भावनेचे दर्शन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol News जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे श्रीकृष्ण नगरात शनिवारी रात्री गणेशोत्सावाच्या निमित्ताने श्रीहरी भजनी मंडळ वराड खुर्द यांच्या भजनाने चौथे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ढोलकी वादक इसाभाई इस्माईल पिंजारी या मुस्लिम भक्ताने भजनाच्या सुरुवातीपासून संपेपर्यंत सलग चार तास ढोलकी वाजन केले. विशेष म्हणजे, हिंदू-मुस्लिम बांधवांमधील जातीय सलोखा व बंधुभाव या संदेशाचे पुन्हा एकदा दर्शन झाले.

आमच्या धर्माप्रमाणे देवाचे नाव घेताना हे योग्य नाही म्हणून मी गणपती या देवतेबद्दल धार्मिक सदभावना राखून देव आमच्या असो की, तुमचा असो शेवटी परमेश्वर एकच आहे, त्याच्याबद्दल सदभावना ठेवणे हे भाविकांचे आद्द कर्तव्य आहे, या भावनेतून मी गणपतीला ढोलकी वाजन करून नमन केले असल्याची भावना ढोलकी वादक इसाभाई इस्माईल पिंजारी यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे,हिंदू-मुस्लिम बांधवांमधील जातीय सलोखा व बंधुभाव या संदेशाचे पुन्हा एकदा दर्शन झाले. सदर भजनी मंडळात एकूण १७ जण होते, त्यापैकी पिंजारी हे एकमेव मुस्लिम बांधव होते, या सर्व बांधवांनी सुमधुर भजने व गवळणी सादर करून गणरायाला वंदन केले.