⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारतीय मानक ब्युरोमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी ; 345 जागांवर भरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 345 जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ९ सप्टेंबरपासून bis.gov.in वर सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 ही निश्चित करण्यात आली आहे.

या पदांसाठी होणार भरती?
1) सहाय्यक संचालक
2) वैयक्तिक सहाय्यक
3) सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)
4) सहाय्यक (CAD)
5) स्टेनोग्राफर
6) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
7) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
8) तांत्रिक सहाय्यक (लॅब)
9) वरिष्ठ तंत्रज्ञ-
10) तंत्रज्ञ-

कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर असणे गरजेचे आहे. पदवीधर, डिप्लोमा,आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्हाला भरतीची जाहिरात पहावी लागेल.

अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर कागदपत्रंची पडताळणी केली जाईल त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती https://www.bis.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

तुम्हाला एवढा पगार मिळेल?
सहाय्यक संचालक- रु.56100/- ते 177500/-
वैयक्तिक सहाय्यक – रु.35400/- ते 112400/-
सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)-रु.35400/- ते 112400/-
सहाय्यक (CAD) -रु.35400/- ते 112400/-
लघुलेखक- 25500/-ते 81100/-
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक- रु.25500/- ते 81100/-
ज्युनियर सचिवालय सहाय्यक -रु.19900/- ते 63200/-
तांत्रिक सहाय्यक (लॅब) -रु.35400/- ते 112400/-
सीनियर तंत्रज्ञ – रु.25500/- ते 81100/-
तंत्रज्ञ -रु.19900/- ते 63200/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा