⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

ब्राह्मण सभा : शताब्दी महोत्सव होणार साजरा!

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । ब्राह्मण सभा जळगाव यंदाचे वर्ष शताब्दी महोत्सव वर्ष ( २०२२-२०२३) साजर करीत आहे. त्यानिमित्त ब्राह्मण सभेने जळगाव शहरातील मराठी भाषिक ज्ञाती संस्थांचा सहभाग वर्षभरातील विविध उपक्रमात व्हावा, यासाठी सर्व संस्थाची एकत्रीत सभा आयोजीत केली होती. शहरातील सर्व ज्ञाती संस्थांचे प्रतिनिधी या सभेस उपस्थित होते. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष तथा शताब्दी महोत्सव समिती प्रमुख ॲड. सुशील अत्रे यांनी ब्राह्मण सभेकडून शताब्दी महोत्सवा निमीत्त घेण्यात येणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमासह घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सभेत माहिती सांगितली.

तसेच हे कार्यक्रम घेत असताना ज्ञाती संस्थांनी देखील विविध उपक्रम सुचवावेत व वर्षभरातील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. शरदचंद्र छापेकर ,प्रा. .अनिल राव, डॉ. जयंत जहागीरदार , व्ही. पी. कुळकर्णी, अशोक वाघ, मिनाक्षी जोशी, निखील जकातदार, वैदही नाखरे यांनी या विषयावर आपापले मते मांडलीत. शताब्दी महोत्सव समिती मान्यवर प.पू. महाराज, प. पू. मंगेश महाराज, भरत अमळकर, प्रा. चारुदत्त गोखले , चंद्रशेखर ठुसे यांनी या प्रसंगी शुभेच्छा दील्यात, सभा संपल्यानंतर प्रा. अनिल राव यांचे हस्ते गणरायाची आरती होऊन अनौपचारिक सभा उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी शहरातील ब्राह्मण सेवा संस्थे तर्फे अध्यक्ष वसंतराव देखणे, जळगाव शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे उपाध्यक्षा मिनाक्षी जोशी, ब्रह्मश्री संस्था तर्फे कमलाकर फडणीस, अशोक वाघ, जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ तर्फे व्हीं पी कुळकर्णी, हेमलता कुळकर्णी, शैलेश कुळकर्णी, ऋग्वेदी मंडळा तर्फे ॲड श्री सुहास जोशी, सुरभी महिला मंडळातर्फे वैदेही नाखरे , स्नेह मंडळा तर्फे निखील जकातदार, नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय मंडळातर्फे आनंद जोशी , चित्त पावन मंडळ, पुरोहित मंडळ, शारदा वेद पाठ शाळा तसेच वरील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ब्राह्मण सभेचे अध्यक्ष तथा शताब्दी महोत्सव समितीचे प्रमुख ॲड. सुशील अत्रे, कोषाध्यक्ष तथा शताब्दी महोत्सव समितीचे सचिव अमोल जोशी, ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी, चिटणीस संजय जोशी, चिटणीस संदिप कुळकर्णी, चिटणीस केदार देशपांडे , कार्यकारणी सदस्य आर आर वैद्य , जितेंद्र याज्ञिक , दत्तात्रय भोकरीकर, अजय डोहोळे, किरण कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, प्रकाश नाईक, राजेंद्र कुळकर्णी, मिरा गाडगीळ तसेच बहुसंख्य मराठी भाषिक समाजबांधव उपस्थित होते.