डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप

एप्रिल 15, 2022 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात आमदारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करण्यात आले.

jayatni

सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरिष शेठ, गनवाणी व पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिप पुजन व माल्यार्पण केले. तसेच धनंजय चौधरी यांचे हस्ते १ वही १ पेन चे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, संस्थेचे संचालक विक्रम बोरकर, दशरथ घेटे, श्रावण घेटे, गयासभाई, युसुफ भाई, रमेश घेटे, ग्यासोद्दीन काजी,अशोक घेटे, संघरक्षक तायाडे, संतोष पाटील, अनिल घेटे, गोपाळ बिरपन, संघरत्न दामोदर, अनिल दत्तु घेटे, उपाध्यक्षा संगिता घेटे, रेखा भालेराव, दिपाली घेटे, अदांगले, निकम, धनराज घेटे, सावन मेढे, समाधान तायडे, विलास लहासे, विकास अटकाळे, सचिन घेटे, नितिन तायडे, प्रविण घेटे, चेतन घेटे, सउद शे, कैलास लहासे, निकम साहेब, अशोक इंगळे, शुभम घेटे, युवा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष सम्यक इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमयश्वीतेसाठी मित्र परिवाराने परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक केले. तर निलेश तायडे यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now