---Advertisement---
बोदवड

बोदवड निवडणूक : राष्ट्रवादीला 3 तर सेनेला 1 जागा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या (Bodwad Nagar Panchayat Election Results) मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. १७ जागासाठी पार पडलेल्या मतदानात चार जागांचे निकाल जाहिर झाले असून यात राष्ट्रवादीने ३, तर शिवसेनेने १ जागेवर विजय मिळविला आहे. बोदवड नगर पंचायतीत ५ नंबर वार्डात राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवाराला समसमान मते

bodvad jpg webp

बोदवड नगरपंचायत निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सत्तांतर होणार का? खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

---Advertisement---

एकनाथराव खडसे यांनीही या निवडणूकीसाठी स्वत: मैदानात उतरूण प्रचार केला आहे, तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनीही यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्याने छुपी युती झाल्याची देखील चर्चा होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची ही कसोटी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर शिवसेनेने निवडणूकीत संपूर्ण १७ जागा लढविल्या आहेत. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले आहेत, तर शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाचीही कसोटी आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची कसोटी आहे.

सुरुवातीला हाती आलेल्या तीन निकालात खडसे गटाचे वर्चस्व दिसून येत असले तरी ऐनवेळी मुक्ताईनगर विधानसभा सारखा निकाल यूटर्न घेऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---